शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

पाचशे मीटरच्या आतच दारूविक्री

By admin | Published: April 12, 2017 4:09 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत ५०० मीटर अंतरापर्यंतच्या हॉटेलांमध्ये मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे.

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत ५०० मीटर अंतरापर्यंतच्या हॉटेलांमध्ये मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. पुणे-मुंबई महामार्गावर निगडी भागात काही हॉटेलचालकांनी ५०० मीटर हद्द सोईस्कर ठरवून घेतली आहे. त्या ठिकाणी दिवस-रात्र खुलेआम मद्यविक्री होत आहे. ही बाब लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून निदर्शनास आले. महामार्गाच्या दर्शनी भागाला लागून असलेल्या परमिट रूम व हॉटेलांमध्ये परमिट रूम बंद असल्याचे सांगितले जाते. रात्री मोटारी घेऊन जाणाऱ्यांना प्रवेशद्वारावरच रखवालदार येथे मद्य मिळणार नाही, असे आवर्जून सांगतात. महामार्गावर दर्शनी भागात न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी होत असल्याचे जाणवले. थोडे अंतर पुढे गेल्यावर गल्ली-बोळात सहज दिसून न येणाऱ्या हॉटेलांमध्ये मद्यपींची गर्दी उसळल्याचे दिसून आले. अंमलबजावणी होत असली, तरी पिंपरी-चिंचवड शहरात सर्रासपणे दारुविक्री होत असल्याचे सोमवारी रात्री केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथे महामार्गाला लागूनच अनेक हॉटेल आहेत. या हॉटेलमध्ये प्रत्यक्ष जाऊन स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. निगडी परिसरात फिरत असताना एखाद्याकडे विचारपूस केल्यास संबंधित व्यक्तीकडूनदेखील थेट त्या ट्रान्सपोर्टनगर येथील हॉटेलचा पत्ता दिला जात होता. या मार्गाकडे जात असताना अनेक मद्यपीदेखील या हॉटेलांकडे जाताना दिसत होते. ट्रान्सपोर्टनगरमधून विविध मार्गांवर गाड्या जात असतात. तसेच राज्यासह राज्याबाहेरील मार्गावर धावणाऱ्या गाड्या येथे येत असतात. अनेक चालक-क्लीनर या ठिकाणीच मुक्कामी असतात. दरम्यान, इतर मार्गांवर दारु मिळो अथवा न मिळो या ठिकाणी मिळणार याबाबत खात्री दिली जात आहे. अपघाताचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महामार्गालगत दारू दुकाने, परमिट रूम, बीअरबार बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून, दारूविक्रीवर बंदी घातली आहे. दरम्यान, शहराची लोकसंख्या २१ लाखांच्या पुढे असल्याने शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या तीनही महामार्गांलगतच्या हॉटेलवरील टांगती तलवार कायम आहे. मोटारीत मद्यसाठा पिंपरीतील महापालिकेसमोरील काही हॉटेलचालकांनी नामी शक्कल लढवली आहे. हॉटेल, परमिट रूममध्ये मद्यविक्री करण्यासाठी एखाद्या खोलीत मद्यसाठा ठेवावा लागेल. हॉटेलची पोलिसांनी तपासणी केल्यास मद्यसाठा आढळून येईल, हे जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे एका हॉटेलचालकाने हॉटेलपुढे उभ्या मोटारीत मद्यसाठा ठेवला असल्याचे निदर्शनास आले. रात्री ११ नंतर उशिरा मर्जीतल्या ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार मोटारीत ठेवेलेल्या मद्याच्या बाटल्या हॉटेलात आणल्या जातात. नंतर रिकाम्या बाटल्यासुद्धा पुन्हा मोटारीच्या डिकीत ठेवल्या जात. शहर परिसरात ३०० हॉटेलजुना मुंबई-पुणे महामार्ग पिंपरी-चिंचवड हद्दीतून जातो. तसेच नाशिक-पुणे महामार्ग आणि पुणे- बंगळुरू हा महामार्गही या हद्दीतून जातो. निगडी ते दापोडी या अंतरात मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे ३०० हॉटेल आहेत. कासारवाडी येथून जाणाऱ्या नाशिक महामार्गाला लागून असलेल्या कासारवाडी, भोसरी परिसरात शंभरहून अधिक हॉटेल आहेत. त्याचबरोबर पुणे-बंगळुरू हा मार्ग शहराच्या बाहेरील बाजूने जातो. या मार्गावर वाकड, ताथवडे, रावेत, किवळे येथील हॉटेल येतात. त्याचबरोबर ५०० मीटरच्या हद्दीत थेरगाव, काळेवाडीतील काही हॉटेल येतात.भोजनासाठी सवलतींचा मारापिंपरी-चिंचवड शहरातून पुणे-मुंबई महामार्ग जातो. या मार्गावर देहूरोड ते दापोडीपर्यंत सुमारे १५०० हून अधिक हॉटेल आणि ढाबे आहेत. काही महिन्यांपूर्वी या हॉटेलसमोर वाहन उभे करण्यास जागा शोधण्याची वेळ यायची. वाहन लावण्यास जागा दाखविण्याकरिता हॉटेलचालक स्वतंत्र कर्मचारी नेमायचे. सध्या परिस्थिती उलट आहे. वाहन उभे करण्यास जागा मुबलक आहे, परंतु हॉटेलमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. ५०० रुपयांच्या वर जेवणाचे बिल झाल्यास तब्बल २५ टक्के बिलात सूट असे फलक काही हॉटेलवर झळकले आहेत. पोलिसांचे दुर्लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गालगतच्या ठरावीक हॉटेलांमध्ये मद्यविक्री होत नाही. परंतु काही अंतरावर गल्ली-बोळात जेथे जाण्याचा मार्ग अडचणीचा आहे; परंतु हॉटेल पाचशे मीटरच्या अंतरावरच आहे, अशा ठिकाणी आजुबाजूच्या ठिकाणच्या हॉटेलांमधील ग्राहक आवर्जून जात आहेत. महामार्गालगतच्या काही हॉटेलांमध्ये मद्य उपलब्ध नसले, तरी जवळच्या अंतरावर कोठे मिळू शकेल, याची माहिती महामार्गावरील हॉटेलवालेच देत आहेत. शराब आगे मिलेगा...वेळ : रात्री १०. ०० : आकुर्डीहून निगडीकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन हॉटेलांमध्ये जाऊन मद्य मिळेल का, अशी विचारणा केली. या ठिकाणी केवळ जेवण उपलब्ध आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे दारुविक्री बंद असल्याचे उत्तर तेथील कर्मचाऱ्याने दिले. रात्री १०.२० : निगडी चौकातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये वाहन उभे करण्यासाठी जात असतानाच ‘सब कुछ बंद है’ असे उत्तर मिळाले. ‘यहॉँ शराब नही मिलेगा, आगे मिलेगा’ असेही सांगण्यात आले. रात्री १०. ४५ : महामार्गापासून हाकेच्या अंतरावरच असलेल्या निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथील एका हॉटेलमध्ये राजरोसपणे दारुविक्री केली जात होती. येथे दारु उपलब्ध होत असल्याने मद्यपींची गर्दीही अधिक होती. ग्राहकाची सर्व प्रकारची व्यवस्था केली जात होती. लगतच्या काही हॉटेलांमध्ये दारु उपलब्ध होत नसल्याने अनेकांचा ओढा याच हॉटेलकडे असल्याचे दिसून आले. जसजसा वेळ होत होता तसतशी गर्दी वाढत होती. वास्तविक पाहता हे हॉटेल महामार्गापासून अगदी जवळ आहे. परंतु त्या हॉटेलपर्यंत जाण्यासाठी वळसा घालून जावे लागते. ते अंतर मोठे असल्याने हे हॉटेल महामार्गापासून ५०० मीटरपेक्षा दूर आहे, असे भासविले जात आहे.(संकलन : संजय माने, मंगेश पांडे)