श्री. छत्रपती संभाजी शिक्षण संस्था आणि केमआरा प्रा.लि. सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी येथे शेतकऱ्यांसाठी झाडांची प्रतिकार क्षमता आणि उत्पादन क्षमता कशी वाढवावी या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्रात शिरूर , पारनेर , श्रीगोंदा या तालुक्यातील ६०-७० सहभाग नोंदवला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थीटे, केमआराचे डॉ. अमोल पाटील, डॉ. मंगेश कोकाटे, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा यांनी मार्गदर्शन केले . या कार्यक्रमास बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती, शिवाजीराव पडवळ, रघुनाथ शिंदे, बजरंग पडवळ, बाळासाहेब कारखिले, विनायक बढे, निळूभाऊ टेमगिरे, सूर्यकांत सालके, संजय दंडवते, वाल्मिकराव कुरंदळे, बारकू कोळपे, बाबाजी पिंपरकर, विट्ठल खरबस, भिमाजी घावटे, नवनाथ फरगडे आदि उपस्थित होते.
शिरुर येथे शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 4:28 AM