ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन यांचं पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 09:45 PM2021-09-17T21:45:38+5:302021-09-17T21:58:22+5:30

पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे मानद प्राध्यापक, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा.टी.पद्मनाभन यांनी भौतिक आणि खगोल विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधनाने भारताला जगात नवी ओळख मिळवून दिली

Senior astronomer Padma Shri Prof. Thanu Padmanabhan passed away in Pune | ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन यांचं पुण्यात निधन

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन यांचं पुण्यात निधन

Next
ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा.टी. पद्मनाभन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली

पुणे : प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि पद्मश्री प्रा.थानू पद्मनाभन यांचे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे मानद प्राध्यापक, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा.टी.पद्मनाभन यांनी भौतिक आणि खगोल विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधनाने भारताला जगात नवी ओळख मिळवून दिली.

त्यांच्या संशोधनात्मक पुस्तकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावली. उदयोन्मुख वैज्ञानिकांना संशोधनाची दिशा दाखविली. भारतीय जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.

प्रा.टी. पद्मनाभन यांच्या निधनाने भारतीय भौतिक, खगोल विज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांचा मार्गदर्शक हरपला आहे. वैज्ञानिक जगताची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा.टी. पद्मनाभन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

समस्त पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वाहिली श्रद्धांजली

"प्रा. टी. पद्मनाभन यांच्या निधनाने खगोलशास्त्र क्षेत्रात शब्दशः पोकळी निर्माण झाली आहे. खगोलशास्त्रात तब्बल चार दशके त्यांनी केलेले संशोधन विविध टप्प्यांवर मार्गदर्शक ठरले. गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र या विषयात त्यांनी केलेले मूलभूत संशोधन त्यांना जगभरात ओळख मिळवून देऊन गेले. त्यांच्या संशोधनाचा पुस्तकरुपी उपलब्ध झालेला ठेवा पुढची कित्येक वर्षे महत्त्वाचा आणि नव्या संशोधनाला दिशा मिळवून देणारा असेल. समस्त पुणेकरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली"

Web Title: Senior astronomer Padma Shri Prof. Thanu Padmanabhan passed away in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.