पुणे : भाजपचे नेते, ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांना लवासा येथील घराच्या अंगणात फिरताना रविवारी ( दि. १ ) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले.त्यामुळे मेंदूला आणि डोक्याला इजा झाली आहे. पुण्यात रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना कल रात्री दहा वाजता अॅडमिट करण्यात आले.त्यांच्यावर उपचार सुरू असून अति दक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, असे रुबीच्या डॉक्टरांनी सांगितले. शौरी यांना काल सुरुवातीला हिंजवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. डोक्याला जखम झाल्याने आयसीयूमध्ये ठेवले आहे.(सविस्तर वृत्त लवकरच..)
भाजपा नेते अरुण शौरी भोवळ येऊन कोसळले, रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 11:45 IST