शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

ज्येष्ठ समीक्षक आणि संशोधक डॉ. सुरेश चुनेकर यांचे पुण्यात निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 11:45 AM

' सहा साहित्यकार', ' अंतरंग', जयवंत दळवी यांची नाटके: प्रवृत्तीशोध' या पुस्तकांव्यतिरिक्त जी. ए कुलकर्णी यांच्या ' सोनपावले' या कथासंग्रहांचे संपादनही त्यांनी केले.

ठळक मुद्देचुनेकरांचा माधवराव पटवर्धन : वाड्मय दर्शन' हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ

पुणे: ज्येष्ठ समीक्षक आणि संशोधक डॉ. सुरेश रामचंद्र चुनेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. डॉ. चुनेकर यांचा जन्म  २७ एप्रिल १९३६ रोजी पुण्यात झाला. साताऱ्यात शिक्षण घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएची पदवी आणि पीएचडी मिळविली. पीचडीनंतर त्यांनी संशोधन कार्याला सुरुवात केली. १९९६ मध्ये पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. मराठी संशोधन पत्रिकेचे संपादन करण्याबरोबरच त्यांनी बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या कवितांची सूची, तसेच त्यांच्या समग्र वाङ्मयाची संदर्भ सूची तयार करण्याचे काम केले.चुनेकरांचा माधवराव पटवर्धन : वाड्मय दर्शन' हा  अत्यंत महत्वाचा ग्रंथ मानला जातो. साहित्य अकादमीसाठी त्यांनी ' माधव ज्युलियन' हा ग्रंथही लिहिला. ' सहा साहित्यकार', ' अंतरंग', जयवंत दळवी यांची नाटके: प्रवृत्तीशोध' या पुस्तकांव्यतिरिक्त जी. ए कुलकर्णी यांच्या ' सोनपावले' या कथासंग्रहांचे संपादनही त्यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास या खंड ५ आणि ६ मध्ये मराठी समीक्षेचा इतिहास याचे लेखनही त्यांनी केले. साक्षेपी संपादन आणि संशोधनाविषयी एकाग्रतेने आणि शिस्तीने केलेले लेखन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य होती.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य