पुणे : मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्र पोटे ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कारांमध्ये 'ललित' या प्रकारात पुण्यातील ज्येष्ठ समीक्षक व लेखक विश्वास वसेकर यांच्या ‘ऋतुबरवा’ या माहितीपूर्ण ग्रंथाची निवड केली आहे. पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे. मातोश्री स्व. सूर्यकांता देवी रामचंद्र पोटे ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र पोटे यांनी मंगळवारी (दि.८) या पुरस्काराची घोषणा केली.
माजी राज्यमंत्री आणि आमदार प्रवीण पोटे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ या ट्रस्टची स्थापना केली आहे. या पुरस्कारांसाठी परीक्षकांनी परीक्षण करुन पुरस्कार समितीच्या सभेत या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केले. समितीच्या संयोजिका डाॅ. शोभा रोकडे तसेच समिती सदस्य डाॅ. कुमार बोबडे, डाॅ. पंकज वानखेडे, आर.एस.तायडे, डाॅ. मंदा नांदूरकर, ॲड. प्राजक्ता राऊत, वृषाली वानखेडे आदी मान्यवरांनी पुरस्कार निवडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.