पिंपरी : ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राजेश नंदा यांचे वयाच्या ८० व्या वर्षी शनिवारी रात्री आठच्या सुमारास आकुर्डी येथील वृद्धाश्रमात निधन झाले. निधन वार्ता समजूनही नातेवाईक न आल्याने वृद्धाश्रमातील कर्मचा-यांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आकुर्डी येथील संत बाबा मोनी साहेब वृद्ध आनंदाश्रमात गेल्या काही कालखंडापासून नंदा वास्तव्यास होते. प्रसिद्ध गझलकार आणि वृद्धाश्रमाचे संचालक अशोक खोसला यांनी आनंदाश्रम येथे आणले होते. वृद्धापकाळाने त्यांचे शनिवारी निधन झाले. त्यावेळीही नातेवाईकांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने वृद्धाश्रम प्रशासनाने नंदा यांच्यावर अंत्यसंस्कार केले. नंदा यांची मोजकीच माहिती वृद्धाश्रमाकडे आहे. ते फक्त एक भाऊ व भाच्चीने माझी सर्व संपत्ती लुटली त्यामुळे नंदा यांच्यावर हालाखीचे दिवस आले होते, असे नंदा यांनी वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी सांगितले होते.अशी आहे वाटचालनिर्माते राजेश नंदा यांनी नतीजा हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. ज्यामध्ये विनोद खन्ना, जुनियर मेहमूद, बिंदु यांनी काम केले होते. तर बेहरुपिया हा चित्रपट दिग्दर्शित केला ज्यामध्ये हेलन, धीरज कुमार यांनी काम केले होते. याबरोबरच त्यांनी पीक पॉकेट तर संत तुकाराम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. खोसलांनी केली होती मदत त्यांना वर्षभरापूर्वी प्रसिद्ध गझलकार अशोक खोसला यांनी आकुर्डी येथील संत बाबा मोनी साहेब वृद्ध आनंदाश्रम येथे आणले. अशोक खोसला हे वृद्धाश्रमाचे संचालक आहेत. ह्यह्यमला प्रसिद्ध कवी सुधीर शर्मा यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितले की दिग्दर्शक नंदा हे एका रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मात्र, त्यांचे कोणी नातेवाईक त्यांच्याजवळ नाही तसेच त्यांना ते सांभाळत नाहीत. यावेळी त्यांच्या नातेवाईकांशी आम्ही संपर्क साधला. मात्र, तो होऊ शकला नाही. तर एकाने त्यांना ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर मी त्यांना आकुर्डी येथे घेऊन आलो व शेवटपर्यंत त्यांची काळजी घेतली.ह्णह्ण
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजेश नंदांचे निधन
By admin | Published: May 22, 2017 12:23 AM