वासुदेव गोडबोले यांनी नोकरी सांभाळत भरपूर इतिहाससंशोधन केले. ‘सावरकर’ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. ‘अभिनव भारत’च्या सांगता समारंभाला ते पुण्यात उपस्थित होते. सावरकर आणि भारतीय क्रांतिकारक याबद्दलची अगणित कागदपत्रे त्यांनी वाचलेली होती.
भारतीय क्रांतिकारक लंडनमध्ये जिथे जिथे वास्तव्यास होते, त्या सगळ्या जागा प्रत्यक्ष फिरून मोफत दाखवण्याचा उपक्रम गोडबोले यांनी गेली ४५ अविरत सुरु ठेवला.
‘लोकांनी खरा इतिहास वाचावा म्हणून वासूकाका बॅगेतून काही पुस्तकेही न्यायचे. टूर गाईडसारखी पोपटपंची वासूकाकांनी कधीच केली नाही. दरवेळी काहीतरी नवनवीन माहिती आणि संदर्भ त्यांच्याकडून कळत असत. आमच्या ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ समूहावर ते कायम सक्रिय असायचे. त्यांची उणिव कायमच भासत राहील’, अशा शब्दांत लंडनमधील संकेत कुलकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या.