पुणे : ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सदाशिव शिवदे (वय ८१) यांचे शनिवारी रात्री अल्पआजाराने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. सदाशिव शिवदे हे सातारा येथे पशुवैद्यक म्हणून काम करीत होते. त्यांनी इतिहासाचा अभ्यास सुरु केला होता. त्यांचे ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा हे पुस्तक गाजले होते. पीएचडीसाठी त्यांचा मराठांच्या इतिहासाची संस्कृत साधने हा विषय होता. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांसह मराठ्यांच्या इतिहासावर बंगाली लेखकांनी लिहिलेल्य दोन इंग्रजी ग्रंथांचे त्यांनी तब्बल ९० वर्षानी अनुवाद केला. पुण्यातील वाड्यांवर त्यांचा अभ्यास होता. त्यांनी तामिळ -मराठी शब्दकोश तयार केला. मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था आणि मराठ्यांची लष्करी व्यवस्था ही पुस्तके त्यांनी लिहिली. आजवर त्यांनी २६ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यावर रविारी सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
- महाराज्ञी येसूबाई, कान्होजी आंग्रे यांच्यावरील पुस्तकांचे लेखन आणि परमानंतद काव्यमय संभाजी महाराजांच्या समकालीन ग्रंथाचा अनुवाद त्यांनी केला आहे. शिवपत्नी सईबाई आणि युद्धभूमीवर श्री शंभूछत्रपती या दोन कांदब-या त्यांनी लिहिल्या.
- पशुवैद्य असल्यामुळे त्यांनी माणी गुरं, माझी माणसं हा कथासंग्रह लिहिला आहे़ त्याचे आकाशवाणीवरुन प्रसारण झाले होते. त्यांकडे पाच हजाराहून अधिक पुस्तकांचा संग्रह आहे़ अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी गाइड म्हणून मार्गदर्शन केले आहे.