लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : मराठीमध्ये प्रवासवर्णन लोकप्रिय करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना सुधाकर प्रभू (८५) यांचे शनिवारी निधन झाले. पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पुत्र व इंग्लंडमधील प्रसिद्ध उद्योजक तुषार प्रभू, लंडनमधील अभियंते हर्षवर्धन ऊर्फ आशू प्रभू, कन्या ॲड. वर्षा ऊर्फ रेवती प्रभू-काळे, जावई राहुल प्रभाकर काळे, तसेच सुना व नातवंडे असा परिवार आहे.
मीना प्रभू यांची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणले होते. शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.