पुणे : ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ आणि संशोधक डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांचे पुण्यात शुक्रवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. डॉ प.वि पुण्याच्या बी. जे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाले. त्यांचा तपकीर बनवण्याचा पिढीजात धंदा होता. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये डिस्टिंक्शन मिळाल्यानंतर पुढे त्यांनी सर्जरीचा अभ्यास केला. ससून हॉस्पिटल, लोकमान्य टिळक आयुर्वेद विद्यालय व शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल येथे सर्जन म्हणून त्यांनी काम केले. १९५९ मध्ये त्यांनी स्वत:चे विष्णुप्रसाद नर्सिग होम सुरू केले.मात्र हे सर्व सोडून प.वि. वर्तक रामायण-महाभारताच्या संशोधनाकडे वळले. ऋग्वेद, महाभारत आदी ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी रामायणाचा काळ ठरवला. रामामध्येही दोष होते असे मत त्यांनी मांडले. संशोधनात्मक अभ्यासातून त्यांनी वास्तव रामायण हा ग्रंथ लिहिला. त्यांचा महाभारतावर आधारित स्वयंभू हा ग्रंथही प्रसिद्ध आहे. सूक्ष्म देहाने मंगळावर व गुरूवर जाऊन त्यांनी तेथील माहिती अवकाशयानांनी मिळविण्याची आधीच प्रसिद्ध केली, असे म्हटले जाते.त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये ' सायंटिफिक डेटिंग ईन महाभारत वॉर, उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरूपण - भाग १ आणि २, गीता - विज्ञाननिष्ठ निरूपण, तेजस्विनी द्रौपदी, संगीत दमयंती परित्याग, दास मारुती नही, वीर हनुमान ! (हिंदी),दास मारुती नव्हे, वीर हनुमान ! (मराठी), पहिले आणि एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर,पातंजल योग या पुस्तकांचा समावेश आहे.
ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ आणि संशोधक डॉ. पद्माकर वर्तक यांचे पुण्यात निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:13 PM
१९५९ मध्ये त्यांनी स्वत:चे विष्णुप्रसाद नर्सिग होम सुरू केले.मात्र हे सर्व सोडून प.वि. वर्तक रामायण-महाभारताच्या संशोधनाकडे वळले.
ठळक मुद्देऋग्वेद, महाभारत आदी ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी रामायणाचा काळ ठरवलामहाभारतावर आधारित स्वयंभू हा ग्रंथही प्रसिद्ध