ठळक मुद्देपुणे-नाशिक महामार्गावर चाकण मार्केट यार्ड कमानीच्या जवळ झाला अपघातटेम्पोचालक नीलेश बिलोरेवर दाखल करण्यात आला गुन्हा
चाकण : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : सरूबाई पितांबर पाटील (वय ७५, रा. चाकण, मूळ गाव निषाने, ता. एरंडोल, जि. जळगाव) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण मार्केट यार्ड कमानीच्या जवळ हा अपघात झाला. ही महिला रस्ता ओलांडत असताना टेम्पोने (एमएच ४० - ७३६०) जोरदार धडक दिली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पोचालक नीलेश बिलोरे (वय २९, रा. कळमदरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.