शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अनगड मुलांच्या मोबाईलला ‘तसल्या’ साइटचा नाद

By admin | Published: June 27, 2015 3:42 AM

अडनिड्या वयातली पोरं एकत्र आली की नुसता धुमाकूळ...पण सध्या या वयातली पोरं एकत्र येऊन चिडीचूप मोबाईलला चिकटलेली असतात. ऊठसूट

पुणे : अडनिड्या वयातली पोरं एकत्र आली की नुसता धुमाकूळ...पण सध्या या वयातली पोरं एकत्र येऊन चिडीचूप मोबाईलला चिकटलेली असतात. ऊठसूट मोबाईल हवाच. त्यांनी वापरलेले मोबाईल काही दिवसांतच हँग होतात? ही काय भानगड...व्हायरस अ‍ॅटॅक होतात- ती फक्त मोबाईलवर की मुलांच्या मनावरही? ऊठ-बस मोबाईल हवेतच कशाला? याचे उत्तर शोधत सध्या पालक समुपदेशकांकडे धाव घेत आहेत. मुलांच्या अनगड जगात सध्या ‘तसल्या’ साइट पाहण्याचे खुळ वाढत आहे. शाळेतील मुलांमध्ये पॉर्न साइट पाहण्याचे प्रमाण वाढलेले असून, वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मुले अशा प्रकारच्या साइटच्या आहारी जात असल्याचे ‘चाईल्ड लाइन’च्या पाहणीतून पुढे आले आहे.वयात आल्यानंतर आकर्षण वाटणे, शारीरिक बदल घडणे, या गोष्टी नैैसर्गिक आहेत; मात्र आता शालेय मुलांमध्ये पॉर्न साइट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल हातात आल्याने ही सोयही सहजी उपलब्ध झाली आहे. त्यातून निरनिराळे व्हिडीओ क्लिप्स, मित्रमंडळींकडून थेट शेअर होणारे पॉर्न साइट सर्फिंगचे आमंत्रण, वाढत्या वयात अपेक्षित प्रश्नांची उत्तरे न मिळणे, मोठ्या मुलांच्या संगतीतील अर्धवट काहीतरी कळणे आणि त्यातून उत्सुकता चाळवण्याने अशा साइटकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वेळा मोठ्या भावंडांच्या मोबाईलमध्ये चोरून पाहिलेल्या क्लिप्स, अशा कारणांनी या व्यसनाच्या विळख्यात मुले अडकत असल्याचे पाहणीत उघड झाले आहे.ज्ञानदेवी संचलित चाईल्ड लाइनच्या प्रमुख अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘‘अनेकदा मुले काहीतरी कामाच्या शोधात असताना, त्यांना अशा प्रकारच्या साइटची ओळख होते. हळूहळू ते याच्या आहारी जातात. दहाव्या वर्षापासून मुले या साइट पाहत असल्याचे पुण्यात निरनिराळ्या शाळेत ज्ञानदेवी संस्थेच्या मार्गदर्शनातून उभ्या असलेल्या बालसेनांकडून वेळोवेळी कळते. ते वय अडनिडे असल्याने यासाठी पालकांनीही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.’’