भवानीनगर : सणसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ‘सेन्सर स्वच्छतागृह’ मिळणार आहे. यासाठी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पाच लाखांचा निधी दिला. तसेच, शाळेत सावता परिषद इंदापूर तालुका, सणसर विकास मंच व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने महात्मा फुले-राजर्षी शाहू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्ताने कोणताही अतिरिक्त खर्च, मिरवणूक यांना फाटा देऊन त्याची जमा झालेली लोकवर्गणी छत्रपती हायस्कूल डिजिटल करण्यासाठी सावता परिषदेचे इंदापूर तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे यांनी जाहीर केली. त्यामुळे पहिले वातानुकूलित डिजीटल शाळा होणार आहे.या वेळी सणसर शाळेचे केंद्रप्रमुख दिलीप बोरकर, मुख्याध्यापिका राणी ढमे, शिक्षक अण्णा ढमे, सुवर्णा आडके, संध्याराणी घोळवे, देवआनंद जमदाडे, राजेंद्र पवार, सिंधू भापकर या शिक्षकांनी वर्षभरात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविल्याबद्दल सावता परिषदेच्या वतीने त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. भरणे म्हणाले, की सणसरमधील गावच्या विकासासाठी युवकांनी एकत्रितपणे केलेली मोहीम प्रेरणा देणारी आहे. आयुष्यात नेहमी फक्त इतरांना आनंद देण्याचे काम केले. तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभा राहण्यास कोणतीच अडचण येणार नाही. सणसर येथे आधुनिक ‘सेन्सर स्वच्छतागृह’ उभारण्यात येणार आहे. या वेळी संजयसिंह निंबाळकर, दीपक चव्हाण यांची भाषणे झाली. विक्रमसिंह निंबाळकर यांनी मंचाच्या कामगिरीचा आढावा घेतला. रोहित निंबाळकर यांनी मंचाच्या वतीने सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. रवींद्र खवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, छत्रपतीचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सपकळवाडीचे सरपंच सचिन सपकळ, जाचकवस्तीच्या सरपंच ज्योती काळे, उपसरपंच दीपक निंबाळकर, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल काटे, सणसरचे ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास कदम, शरद कांबळे, अरूणा खवळे, धनंजय गायकवाड, विश्वासराव जाचक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांसाठी ‘सेन्सर स्वच्छतागृह’
By admin | Published: April 27, 2017 4:52 AM