पुणे - सॅनिटरी नॅपकिनचा कचरा हा शहरांमध्ये मोठी समस्या झाली असून, शहरामध्ये महिन्याला २० लाखांपेक्षा अधिक सॅनिटरी नॅपकिन कच-यांमध्ये टाकले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. योग्य विल्हेवाट न लावल्याने हा सॅनिटरी नॅपकिनचा कचरा घातक ठरत आहे. यामुळे सॅनिटरी नॅपकिनची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे व महिला, मुलींमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र ‘अॅप’ विकसित करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे महिलांना एक बटण दाबल्यावर सॅनिटरी नॅपकिन घेऊन जाण्यासाठी संबंधित व्हेंडर घरी येऊ शकणार आहे.शहरात दररोज होणा-या कच-यातील डायपर आणि नॅपकिन्सचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. शहरात काही संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महिन्याला २० लाख पेक्षा अधिक सॅनिटरी नॅपकिन कचºयांमध्ये फेकले जातात. तर शहरात दररोज निर्माण होणाºया कचºयांमध्ये ३ टक्के म्हणजे तब्बल ४२ टन कचरा हा लहान मुलांचे डायपर आणि सॅनिटरी नॅपकिनचा असतो.परंतु याबाबत महिला, मुलींमध्ये जनजागृती नसल्याने हा कचरा हाताळताना सफाई कर्मचाºयांना स्वत:चे आरोग्य धोक्यात घालावे लागते आहे. वैद्यकीयदृष्ट्या नॅपकिन्स हे जैविक कचºयामध्ये मोडत असले, तरी सध्या घरातल्या रोजच्या कचºयामध्ये हे सॅनिटरी नॅपकिन आणि डायपर फेकले जातात.परिणामी वेचकांसाठी ही हाताळणी त्रासदायक ठरते. पावसाळ्यात कचरा ओला झाल्यास प्रचंड दुर्गंधी पसरते. त्यामुळे महिलांना हा कचरा फेकताना जागरूक करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या माहित व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र ‘अॅप’ विकसित करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये आपल्या परिसरात सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशिन कोठे आहे, एक बटण दाबल्यानंतर संबंधित व्हेंडर हा कचरा घेऊन जाण्यासाठी घरी येईल, अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.शहराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रमशहरात दररोज निर्माण होणारा लाखो सॅनिटरी नॅपकिनचा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने डिस्पोजल करण्यासाठी शहरात सर्वत्र मशिन बसविण्यात येणार आहे. परंतु याबाबत महिला, मुलींमध्ये जनजागृती झाली तरच या मशिनचा उपयोग होऊ शकतो. यामुळेच महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या कचºयाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वतंत्र अॅप विकसित करण्यात येत आहे. वाढता सॅनिटरी नॅपकिनचा कचरा भविष्यात शहरासाठी घातक ठरू शकतो. यामुळेच याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्नसुरू आहेत. - राणी भोसले, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा
डिस्पोजलसाठी स्वतंत्र ‘अॅप’, सॅनिटरी नॅपकिनबाबत अॅपद्वारे महिलांना देणार माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:21 AM