पुणे : उपचार घेऊन कोरोनामधून मुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा सेल सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती शाखेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.
शाखेच्या पश्चिम महाराष्ट्र मनाली भिलारे यांनी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांच्या समवेत आयुक्तांना याबाबतचे निवेदन दिले. प्रदेश सरचिटणीस स्नेहल शिनगारे, तसेच गीतांजली सारगे, सोनाली गाडे, शिवानी माळवदकर, विणा कात्रे, ऋृतुजा शिर्के यावेळी उपस्थित होते.
भिलारे म्हणाल्या की, शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, पण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यांची नाव-पत्ता यासह सर्व माहिती महापालिका प्रशासनाकडे आहे. कोरोना रुग्णाला बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा दिल्यास उपयोग होतो. त्यामुळे प्रशासनाने बऱ्र्या झालेल्या रुग्णांमधील रक्तदानास तयार असलेल्यांची यादी तयार करून त्याचा एक स्वतंत्र सेल करावा.
महापालिकेला फारसा खर्च येणार नाही अन् मनु्ष्यबळही फार लागणार नाही. काही स्वयंसेवी संस्थाही महापालिकेला त्यासाठी मदत करू शकतील, असे भिलारे यांनी आयुक्तांना सांगितले. त्यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत अशी स्वतंत्र यंत्रणा त्वरित निर्माण करण्याचे आश्वासन दिले.