शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

वेगळी महापालिका ‘भाजप’च्या पथ्यावर पडणार

By admin | Published: April 10, 2015 5:40 AM

नवीन ३४ गावांचा समावेश करताना उत्तर-पूर्व भागासाठी वेगळी महापालिका केल्यास पुणे महापालिकेतील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत.

हणमंत पाटील, पुणेनवीन ३४ गावांचा समावेश करताना उत्तर-पूर्व भागासाठी वेगळी महापालिका केल्यास पुणे महापालिकेतील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला धक्का देत सत्तेवर येण्याचे आडाखे भाजपच्या नेत्यांकडून आखले जात आहेत. पुणे महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करताना वेगळी महापालिका करण्यासाठी आवश्यक निकषांची तपासणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकतीच केली. त्या अगोदरपासून येरवडा, वडगावशेरी, मुंढवा, हडपसर व कोंढवा या पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी सुरू आहे. त्यासाठी भाजपचे स्थानिक आमदार योगेश टिळेकर व जगदीश मुळीक आग्रही आहेत. सद्यस्थितीमध्ये पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभागांत भाजप, शिवसेना व मनसेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, महापालिकेच्या चारही दिशेच्या उपनगरांत राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्राबल्य आहे. पूर्व व उत्तर भागात मिळून स्वतंत्र महापालिका झाल्यास पुणे महापालिकेचे साधारण एक तृतीयांश नगरसेवक कमी होणार आहेत. त्यामध्ये ७५ टक्के नगरसेवक राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे आहेत. त्यामुळे महापालिका वेगळी झाल्यास काँग्रेस आघाडीला धक्का बसणार आहे. शहरात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला शतप्रतिशत सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वेगळी महापालिका होणे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. त्यादृष्टीने भाजपच्या नेत्यांकडून आडाखे व मनसुबे आखले जात आहेत. त्यादृष्टीने काही राजकीय मंडळींनी सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र, त्याविषयी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते अद्याप अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.