शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

भिन्नलिंगींसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृह

By admin | Published: December 02, 2014 11:44 PM

देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये आता यापुढे भिन्नलिंगीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) विचार सुरू

पुणे : देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये आता यापुढे भिन्नलिंगीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) विचार सुरू असून, त्याबाबत लवकरच सर्व विद्यापीठे, महाविद्यालये व संस्थांना निर्देश दिले जाणार आहेत. या संस्थांमध्ये भिन्नलिंगींची होणारी कुचंबणा टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘अस्तित्व’ या संस्थेच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ‘लोकमत’ला दिली. सर्वोच्च न्यायालयाने पुरुष व महिलांप्रमाणेच भिन्नलिंगींनाही अधिकृत दर्जा देत ओळख मिळवून दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी नारायण त्रिपाठी या सर्व शासकीय कार्यलये, शैक्षणिक संस्थांमध्ये भिन्नलिंगींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये भिन्नलिंगींना स्वच्छतागृहाचा वापर करताना कुचंबणा सहन करावी लागते. त्यांचा लैंगिक छळ होतो. त्यांच्यावर रॅगिंग केले जाते. विविध शिष्यवृत्त्यांमध्ये त्यांना स्थान मिळत नाही. एकूणच शैक्षणिक प्रवाहात हा समाजघटक दुर्लक्षित राहिला आहे, हे लक्षात घेऊन त्रिपाठी यांनी ‘यूजीसी’कडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. याविषयी अधिक माहिती देताना त्रिपाठी म्हणाल्या, की भिन्नलिंगींसाठी यूजीसीने आपल्या धोरणांमध्ये विविध बदल केले आहेत. आणखी काही बदल अपेक्षित आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये भिन्नलिंगींना स्वतंत्र स्वच्छतागृह असण्याबाबत यूजीसीने निर्णय घेतला आहे. त्याबाबत लवकरच सर्व संस्थांना कळविले जाणार आहे. त्याचबरोबर भिन्नलिंगींवर रॅगिंगही होते. त्याबाबत कायद्यात तरतूद, संशोधन शिष्यवृत्ती यांसह शिक्षणामध्ये इतरांप्रमाणे त्यांना सर्व प्रकारचे अधिकार मिळावेत यासाठी यूजीसीकडे पाठपुरावा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यूजीसीला हे निर्णय घ्यावे लागतील. (प्रतिनिधी)