पुणे : हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी मराठा जातीचा अवमान करून निर्मला यादव यांची मानहानी केली आहे. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणे, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन करणे, अंधश्रद्धा पसरविणे, उच्च - नीचता पाळणे, भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन करणे आदी आरोपांखाली डॉ. खोले यांना त्वरित अटक करून निलंबित करावे, या मागणीसाठी २५ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.मराठा जातीच्या महिलेने सोवळं मोडले असून आमचा देव बाटला, असे सांगत मेधा खोले यांनी निर्मला यादव यांच्यावर गुन्हा दाखल केला. २५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मूक मोर्चा नसून यात बहुजन आणि पुरोगामी संघटना सहभागी होणार आहेत.
‘सोवळं’ प्रकरणी २५ सप्टेंबरला मराठा मोर्चा, मेधा खोले यांना अटक करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 3:58 AM