पिंपरी : बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणाहून किंमती बांधकाम साहित्यांची चोरी करणा:या दहा महिला चोरटय़ांच्या टोळीला पकडण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे या सराईत महिला चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या. या टोळीकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
प्रतळाबाई भिमा राठोड (वय 45), ललीता ज्ञानेश्वर राठोड (वय 35, दोघी रा. इंदिरानगर, चिंचवड), शालन बद्दू चव्हाण (वय 4क्, रा. मोहननगर, चिंचवड), पुतळा मेंगू चव्हाण (वय 5क्, रा. चिखली), मुक्ता चव्हाण (वय 45), मिना बाबू राठोड (वय 4क्), कस्तुरा सुभाष राठोड (वय 45), सुनिता रमेश राठोड (वय 31), टिपूबाई रामू राठोड (वय 52, सर्व रा. चिखली) अनिता भद्दू राठोड (वय 35, रा. मोहननगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या महिला आरोपींची नावे आहेत.
या महिला चोरांनी मोरवाडी चौकातील विस्डम पार्क येथे सुरु असलेल्या बांधकाम साईटवर 1क् सप्टेंबरला चोरी केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमे:यात ही चोरी कैद झाल्याचे समोर आले. सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता महिलांचे वर्णन समजले. त्यानुसार या महिला चोरटय़ांचा शोध घेवून शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 6क् हजार रुपये किंमतीचे 2क् केबलचे बंडल हस्तगत करण्यात आले.
या महिला बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सकाळीच काम मागण्यासाठी जात. काम भेटल्यावर रखवालदाराला बोलण्यात गुंतवून तसेच इतर कामगारांची नजर चुकवून बांधकाम साहित्य किंमती बांधकाम साहित्यावर डल्ला मारुन पसार व्हायच्या यामध्ये लोखंडी नळ, पाईप, वायरचे बंडल यांचा समावेश असायचा. तसेच कंपन्यांमध्येही चोरया करायच्या.
या महिला सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर निगडी, चाकण, दौंड आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती फौजदार हरिष माने यांनी दिली. (प्रतिनिधी)
अशोक थिएटरला आग
4पिंपरीतील अशोक थिएटरमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली.
4शुक्रवारी सायंकाळी चित्रपट सुरु असताना अचानक आग लागल्यानंतर लगेचच सर्वाना थिएटरच्या बाहेर काढण्यात आले. या आगीत थिएटरमधील खुच्र्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी दाखल झालेल्या अगिAशामक दलाच्या जवानांनी तासाभरातच आग आटोक्यात आणली.