पुणे: एनआयबीएम कोंढवा परिसरातील उंद्री रस्ता, साळुंखे विहार रस्ता, तसेच कौसर बाग या भागात मोठ्या प्रमाणावर कचरा साठत आहे. पुणे महापालिकेकडून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता जाळण्याची प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि धूर निर्माण होऊ लागला आहे. हे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना कचरा उचलण्याबाबत जाब विचारला असता त्यांनी वेतन मिळत नसल्याचे कारण सांगून साफ नकार दिला आहे.
कोरोना काळात इतर आजारांना आमंत्रण नको. या उद्देशाने आधीच नागरिक घाबरले आहेत. त्यातून महापालिकेकडून कचरा समस्यांवर दुर्लक्ष केले जात आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जाळण्याची प्रक्रिया करणे. असे कुठल्याही आदेशात नमूद केले नाही. तरीही वेतना न मिळाल्याची कारणे देत कर्मचारी मनमानी कारभार करू लागले आहेत. असे नागरिकांचे म्हणणे आहे.
"मार्च महिन्यात एक ग्रुपने कचरा साफ करण्यास सुरुवात केली होती. तसेच त्याठिकाणी रोपटे आणि आणि स्वच्छता मोहीम संदेशाची फलके लावून जनजागृती करण्यात आली होती. पण कचरा टाकणारेच ऐकत नसल्याने काही दिवसांनी हे बंद करण्यात आले. महापालिकेकडे कचरा गोळा करण्याचे वेळापत्रक नाही. कचरा उचलायचा सोडून ते जाळत आहेत. हे आरोग्यास हानिकारक आहे. तसेच या साथीच्या दिवसात कोव्हिडं कचऱ्याची याच प्रकारे विल्हेवाट लावली जात आहे. असे येथील रहिवाशी शेहनाज चावला यांनी सांगितले आहे."
सद्यस्थितीत आम्ही स्वखर्चाने कचरा व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कचऱ्याचा हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी ते विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेसाठी नवीन योजना आखण्याचे चालू असल्याचेही स्थानिकांनी सांगितले आहे.