शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

नवनियुक्त १३०० कर्मचाऱ्यांची सेवा खंडित; कोरोना काळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 1:12 AM

चालक व वाहकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महामंडळाने मागील वर्षी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली.

पुणे : सरळसेवा भरती प्रक्रियेतून चालक व वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या सुमारे १३०० कर्मचाऱ्यांची सेवा एसटी महामंडळाने तात्पुरती खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियुक्तीनंतर सहा महिन्यांतच त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. तसेच ३२०० कर्मचाºयांचे प्रशिक्षणही थांबविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना नियुक्तीपुर्वीच घरी बसावे लागणार आहे.

चालक व वाहकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महामंडळाने मागील वर्षी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली. त्यातून ८०२२ पदे भरली जाणार होती. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून परीक्षा घेण्यात आली. सुमारे ४५०० पात्र उमेदवारांपैकी १३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून डिसेंबरपासून चालक व वाहक पदावर नियुक्त्या देण्यात आल्या.

सध्या सुमारे ३,२०० चालक व वाहक तसेच २३२ अन्य पदावरील अधिकारी व कर्मचाºयांचे प्रशिक्षण सुरू होते. एसटीमध्ये नियुक्त होणारे कर्मचारी सुरूवातीला रोजंदारी गटात असतात. मागील चार महिन्यांपासून एसटीची सेवा बंद आहे. त्यामुळे महसुल थांबल्याने कर्मचाºयांच्या वेतनासाठीही पैसे नाहीत.सध्या सुरू असलेल्या बस तसेच इतर सेवांसाठी आवश्यक मनुष्यबळापेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने रोजंदारीवर नियुक्त १३०० कर्मचाºयांची सेवा तात्पुरती खंडित केली आहे.

इंटकचा निर्णयास विरोध

महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने या निर्णयाला विरोध केला आहे. प्रशासनाने कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आणली आहे. लॉकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित कामगारांच्या वेतनात कोणतीही कपात न करण्याचा शासनाचा आदेश तरीही महामंडळच शासन निर्णयाला केराची टोपली दाखवित आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेऊन कर्मचाºयांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे