लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : जगद्गुरु संत तुकाराम महाराज तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरातून पंढरपूरकडे रवाना झाली. लाखो वैष्णवांचा मेळा असणाऱ्या या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीने जंगी स्वागत केले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालये, संस्था यांच्या वतीने वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा, अन्नदान तसेच प्रवासात उपयोगी पडणाऱ्या साहित्याचे वाटप करून वारीचा आनंद मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. उद्योगनगरीने केलेल्या या सेवेला वारकरी बांधव आनंदून गेले. तसेच या वारीसाठी शहरवासीयांकडून शुभेच्छा दिल्या.घोरावडेश्वर ट्रेकींग ग्रुपपिंपरी : घोरावडेश्वर ट्रेकिंग व बालाजी ग्रुप यांच्या वतीने चिंचवड येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीमधील वारकऱ्यांना बिस्कीटवाटप करण्यात आले. या वेळी उमाकांत डिग्गीकर, राजू पठारे, सतीश शेळके, माणिक म्हेत्रे, संजय दळवी, अनिल शेळके, शैैलेंद्र शेळके, सुनील दळवी व सभासद उपस्थित होते. या वेळी दिंडी प्रमुखांना श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. जय मल्हार बचत गटचिखली : म्हेत्रेवाडी येथील जय मल्हार बचत गटाच्या वतीने संत तुकाराममहाराज यांच्या पालखीमध्ये वारकऱ्यांना बिस्कीट व राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. तसेच या वेळी दिंडीप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उषा म्हेत्रे, वर्षा शिंदे, प्रतिमा खंगले, निशा औैटी, शीतल राऊत, नीता सपकाळ व इतर महिला सभासद उपस्थित होत्या. संघवी केसरी माजी विद्यार्थी संघटना पिंपरी : चिंचवड येथील संघवी केसरी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच वारकऱ्यांना बिस्किटाचे वाटप करण्यात आले. या वेळी गजानन चिंचवडे, माणिक म्हेत्रे, राजू पठारे, रामभाऊ जमखंडी, अविनाश पेठकर, जाकिर शिकलगार, रोहिदास जाधव व संघटनेचे सदस्य उपस्थित होते. श्री सयाजीनाथमहाराज विद्यालयभोसरी : वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथमहाराज विद्यालयातर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापक माजी आमदार राम मोझे यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी प्राचार्य राजकुमार गायकवाड, मुख्याध्यापक अनिल खांदवे, सामाजिक कार्यकर्ते राजू तापकीर उपस्थित होते. आॅल इंडिया धनगर समाज महासंघपिंपरी : संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आॅल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने पिण्याच्या पाण्याची बाटल्या आणि बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर हे वाटप झाले. या वेळी शहर आघाडी अध्यक्ष दीपक भोजने, युवा आघाडी अध्यक्ष महावीर काळे, उपाध्यक्ष नवनाथ देवकाते, संजय नाईकवडे, युवा उपाध्यक्ष प्रदीप वाघमोडे, सचिव संतोष पांढरे, उमाकांत सोनटक्के, हिराकांत गाडेकर, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुनील वाघमोडे उपस्थित होते.कै. चंद्रभागा आनंदराव भोसले प्रतिष्ठानपिंपळे गुरव : कै. चंद्रभागा आनंदराव भोसले प्रतिष्ठानाच्या वतीने वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा टॅँकर उपलब्ध करून देण्यात आला. दत्तात्रय भोसले, नथुराम ठोकळे, आण्णा माळी, प्रवीण भोसले आदींच्या हस्ते पाणीवाटप करण्यात आले. सोमनाथ कोरे, डॉ. वसंत भांदुर्गे, रवी बालवडकर यांच्या हस्ते पाण्याचे ड्रम वाटण्यात आले. हभप कै. शांताराम बाईत प्रतिष्ठानाच्या वतीने वारकऱ्यांना औषधवाटप झाले. डॉ. प्रीती थोरात, डॉ. शेख, रवींद्र बाईत, शंकर जगताप, नगरसेवक शशिकांत कदम उपस्थित होते.
उद्योगनगरीने केली वारकऱ्यांची सेवा
By admin | Published: June 19, 2017 5:31 AM