शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

शंभर किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक उभारणार : किरण गित्ते 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:43 AM

प्रस्तावित पुरंदर विमानतळाला सर्व बाजूने वाहतूक मार्ग जोडण्यासाठी १०० किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) उभारण्यात येणार आहे,

ठळक मुद्देपीएमआरडीएचा ५४ हजार कोटींचा सर्वकष वाहतूक आराखडा तयार सन २०३८ पर्यंत म्हणजे २० वर्षांचा विचार करून चार टप्प्यांत कामाचे नियोजनजानेवारी ते जून २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीत प्रत्यक्ष पाहणी करून हा वाहतूक आराखडापीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात दहा तालुक्यांचा समावेश दर पाच वर्षांनंतर हा आराखडा सुधारित करण्याची तरतुद करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आराखड्याला मान्यता प्रामुख्याने मेट्रो, रिंगरोड, बीआरटी मार्ग, बस टर्मिनल वर्तुळाकार रेल्वे आदी व्यवस्था उभारण्यात येणार

पुणे :  पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने पुणे शहरा लगतचा वेगाने वाढणाºया उपनगरांचा पुढील २० वर्षांचा सर्वकष वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार केला आहे. शहरालगतच्या १० तालुक्यांचा यात समावेश केला आहे. प्रामुख्याने मेट्रो, रिंगरोड, बीआरटी मार्ग, बस टर्मिनल वर्तुळाकार रेल्वे आदी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. या सर्वांसाठी ५४ हजार ६०१ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळाला सर्व बाजूने वाहतूक मार्ग जोडण्यासाठी १०० किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) उभारण्यात येणार आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.

सन २०३८ पर्यंत म्हणजे २० वर्षांचा विचार करून चार टप्प्यांत कामाचे नियोजन करण्यात येत आहे. जानेवारी ते जून २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीत एल अ‍ॅँण्ड टी कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करून हा सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. यासाठी या कंपनीला ३ कोटी रूपये देण्यात येणार आहे. त्यातील २० टक्के रक्कम (६० लाख रूपये) अदा करण्यात आली आहे. औंध येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्याचे सादरीकरण आयुक्त किरण गित्ते, नगर नियोजनकार विवेक खरवडकर यांनी केले.किरण गित्ते म्हणाले, की पुणे महानगरपालिका हद्द (३३२ चौरस कि.मी. क्षेत्रफळ), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्द (२१० चौरस कि. मी. क्षेत्रफळ) असे एकूण ५४२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा यामध्ये समावेश केला आहे, तर उर्वरित पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, पुणे शहर, हवेली, खेड, शिरूर, दौंड, पुरंदर, भोर व वेल्हा आदी दहा तालुक्यांचा समावेश केला असून, एकूण २ हजार १७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळासाठी सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पीएमआरडीएच्या बैठकीत आराखड्याला मान्यता मिळाली आहे. तसेच दर पाच वर्षांनंतर हा आराखडा सुधारित करण्याची तरतुद करण्यात येणार आहे. राज्यातील मुंबई नंतर सर्वात वेगाने विकसित होत असलेले शहर हे पुणे आहे. नवी मुंबई आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळामुळे पुण्याच्या विकासामध्ये मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचे नियोजन पीएमआरडीए करत आहे. ...........................पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, रेल्वे विभाग, पुणे आणि ग्रामीण पोलीस, वाहतूक विभाग, तीन कॅन्टोमेंन्ट विभागाचे आधिकारी तसेच नगरपालिकांच्या मदतीने पीएमआरडीएच्या सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि उपनगरांमध्ये पायाभूत सुविधा यातून मोठ्या प्रमाणात निर्माण होतील.-विवेक खरवडकर, नगर नियोजनकार, पीएमआरडीए ........................असा असेल वर्तुळाकार रेल्वे मार्गशंभर किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) मुळशी तालुक्यातील मळवली येथून सुरू होईल. हा मार्ग पुढे तळेगाव दाभाडे-भांबोली-वाकी बु.-चाकण-शेलपिंपळगाव-शिक्रापूर, घोलपवाडी-उरळगाव-मांडवगण फराटा-दौंड-पाटस-राजेवाडी (प्रस्तावित पुरंदर विमानतळ स्टेशन)-उरूळी कांचन-आळंदी म्हातोबाची-उंड्री-पिसोळी-कोंढवा-कात्रज-चांदणी चौक-बाणेर-पाषाण-वाकड-थेरगाव-देहूरोड-वडगाव मावळ आणि मळवली असा मार्ग राहणार असल्याचे किरण गित्ते यांनी सांगितले. ......................सिंहगड रोड ते पुणे कॅन्टोंमेंट मार्गावर ‘लाईट’ मेट्रो सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर चौक ते पुणे कॅन्टोंमेंट असा (९.०८ कि.मी.), चांदणी चौक ते हिंजवडी (१७.८१ कि.मी.), वारजे ते स्वारगेट (८.८७ कि.मी.) आणि वाघोली ते हिंजवडी या मार्गावर लाईट मेट्रो धावणार आहे. लाईट मेट्रोचा प्रयोग प्रामुख्याने या ठराविक मार्गावरच होईल. ‘लाईट’ मेट्रोमध्ये बोगी संख्या, आसनक्षमता आणि नियमित मेट्रो मार्गापेक्षा खर्च कमी तसेच मेट्रो स्टेशनची लांबी कमी असते. याबाबत महामेट्रो कंपनीबरोबर चर्चा करण्यात आली आहे. हा प्रयोग प्रथमच करण्यात येत आहे.  ................पीएमआरडीए आता पीएमपीएलचा सदस्य असणार सध्या पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या प्रामुख्याने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएल) सदस्य आहेत. पीएमपीएलच्या बसेस शहरालगतच्या ग्रामीण भागातही धावत आहेत. हा सर्व भाग पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येत आहे. या भागात पीएमआरडीएच्या वतीने रिंगरोड, बीआरटी मार्ग, नगर रचना योजनांचे (टीपी स्कीम) काम सुरू आहे. त्यामुळे पीएमपीएलचा पीएमआरडीए देखील सदस्य असावा, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्तेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड