शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 11:08 AM

महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Maval Vidhan Sabha ( Marathi News ) :मावळ विधानसभा मतदारसंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कारण शेळके यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ११ नंतरही प्रचार रॅली सुरू ठेवत फटाके फोडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मावळात यंदा विद्यमान आमदार सुनील शेळके विरुद्ध अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांकडून लोकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रचारही सुरू आहे. मात्र सुनील शेळके यांच्याकडून काल रात्री उशिरापर्यंत प्रचाररॅली करत फटाके फोडण्यात आले. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शेळके यांच्यासह नामदेव दाभाडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मावळमध्ये कसं आहे राजकीय चित्र? 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मावळमध्ये एकूण १८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी प्रक्रियेत सहा अर्ज बाद झाले होते. तर अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी सहा जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मावळच्या रिंगणात फक्त सहाच उमेदवार राहिले आहेत. बापू भेगडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. शेळके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे असून, त्यांना पक्षांतर्गत बापूसाहेब भेगडे यांचे तगडे आव्हान होते. भेगडे यांची महामंडळावर वर्णी लावून त्यांच्या नावावर फुली मारल्याचे स्पष्ट झाले होते. पण, भेगडे यांनी महामंडळ नाकारून निवडणूक लढवणार असल्याची ठाम भूमिका घेतली. तसेच, अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीनेही उमेदवार न देता पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेळके यांच्यासमोर भेगडे यांचे तगडे आव्हान असणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maval-acमावळwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024NCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती