काठापूर बुद्रुकमधील भोकरवाडीमध्ये शेतकरी रामदास थोरात, धनंजय करंडे, विनय घुले या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस डीपीवर झालेल्या स्फोटामुळे जळून गेला आहे. रात्रीच्या वेळी हा ऊस पेटल्याने हा ऊस विझवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली. या वेळी सरपंच अशोक करंडे, संपत करंडे, फकिरा करंडे, वसंत करंडे, संदीप जाधव यांनी प्रयत्न केले. त्यांना आग विझविण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या उसाला लागूनच अजूनही १० ते १५ एकर ऊस आहे. परंतु येथील नागरिकांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नामुळे बाकीचा ऊस आगीपासून वाचवण्यात यश आले. सदर उसाची पाहणी भीमाशंकर कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.उसाची तोडणी सुरु केली. या वेळी सरपंच अशोक करंडे,उपसरपंच विशाल करंडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या वीजवाहक तारांची उंची वाढवली पाहिजे.तसेच डीपी शेताच्या बांधावर घेऊन त्यांची दुरुस्ती केली पाहिजे, अशी मागणी उपसरपंच विशाल करंडे यांनी केली आहे.
काठापूर बुद्रुक येथे सात एकर ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:11 AM