शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

सप्तरंगी फिरते दिवे अन् बारा हजार पणत्या; देवदिवाळीनिमित्त उजळले पुण्यातील दत्तमंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 19:07 IST

पुणे : गोलाकार फिरणारे तेलाचे दिवे, रंगीबेरंगी फुलांची आकर्षक रंगावली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराचा परिसर ...

पुणे : गोलाकार फिरणारे तेलाचे दिवे, रंगीबेरंगी फुलांची आकर्षक रंगावली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर उजळून निघाला. संपूर्ण मंदिरावर तेलाच्या १२ हजार ५०० दिव्यांची आकर्षक आरास हे यंदा मंदिराच्या १२५ व्या वर्षी साज-या झालेल्या दीपोत्सवाचे वैशिष्टय होते. पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेला या दीपोत्सवाने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त तेलाच्या १२ हजार ५०० सप्तरंगी फिरत्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तसेच आकर्षक पुष्परचना साकारुन पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव करण्यात आला. सुभाष सरपाले व सहका-यांनी ही सजावट केली. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही देवदिवाळीनिमित्त मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराचे प्रवेशद्वार व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले. तसेच कळसावर संपूर्णपणे रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. कळसावर ओम, श्री व स्वस्तिक च्या शुभचिन्हांची सजावट देखील पणत्यांच्या माध्यमातून करण्यात आली. मंदिरात अनेक प्रकारच्या समई व दिवे पाहण्यासोबतच दत्तमंदिरातील दीपोत्सवाचे मोबाईलमध्ये दृश्य कैद करण्याकरीता व मार्गशीर्ष गुरुवार मुळे भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :PuneपुणेTempleमंदिरSocialसामाजिकDatta Mandirदत्त मंदिर