ओतूर : घरातील मौल्यवान ऐवज कागदपत्रे आदी गोष्टींच्या सुरक्षिततेसाठी त्या बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात येतात मात्र त्या लॉकरचे दार उघडेच राहिले तर... तर तुमच्या लॉकरमधूनही ते मौल्यवान वस्तू गायब होण्याची शक्यता बळावते. मात्र ही गोष्ट प्रमाणिक माणसाला कळाली तर त्या गोष्टी लॉकरच्या बाहेर असल्या तरी सुरक्षित राहतात हाच अनुभव ओतूर येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या ओतूर शाखेमध्ये आला आणि त्या प्रमाणिक माणसाचे नाव आहे ओंकाश ?????? शिंगोटे.
त्याचे घडले असे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या ओतूर शाखेमध्ये बाजीराव धर्माजी डुंबरे यांचे लॉकर आहे. त्यामध्ये सुमारे सात लाखांचे दागिने त्यांनी ठेवले मात्र लॉकरचे दाराला लॉक न करताच ते निघून गेले सुमारे पाच महिन्यांपासून ते लॉकल अनलॉक अवस्थेत होते. बुधवारी काही कामानिमित्त जनप्रिय पतसंस्थेचे कर्मचारी ओंकार शिंगोटे हे बॅंकेतील लॉकर्स विभागात गेले होते. त्यावेळी तेथील एक लॉकर अनलॉक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ही बाबत तातडीने बॅंकेचे शाखा प्रमुख नितीन रोकडे आणि विकास अधिकारी सुभाष डोके यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ते लॉकर कोणाचे आहे ते शोधून लॉकरधारक बाजीराव डुंबरे यांना फोन करून लॉकर अनलॉक असल्याची माहिती दिली त्यावेळी डुंबरे यांनी बॅंकेत धाव घेतली व लॉकरमधील गोष्टी चेक केल्या. त्यावेळी त्यांचे सर्व दागिने व ऐवज आहे तसा असल्याचे त्यांना आढळले. ओंकाश शिंगोटे यांच्या प्रामाणिकपणामुळे डुंबरे यांचा मौल्यवान ऐवज सुरक्षित राहिला.
ओतूर शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रामाणिक पणामुळे लाॅकर धारक डुंबरे यांना त्यांचा सर्व ऐवज सुरक्षित मिळाला आहे. त्यानिमित्त बॅंकेचे ज्येष्ठ संचालक ॲड. संजयराव काळे साहेब, बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे, विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे यांनी शिंगोटे यांचे विशेष कौतुक केले.