आतापर्यंत १ हजार ५३ बरे झाले आहेत. ११० जणावर कोविड सेंटर तर १० जण घरीच उपचार घेत आहेत. ५२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
ओतूर शहरातील बाधितांची संख्या ६२५ झाली आहे. ५४१ बरे झाले आहेत. ५० जण कोविड सेंटर व ९ जण घरीच उपचार घेत आहेत. २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
पाचघर येथील बाधितांची संख्या १३ झाली आहे. १० जण बरे झाले आहेत. १ कोविड सेंटर तर १ घरीच उपचार घेत आहे.
आंबेगव्हाण येथील बाधितांची संख्या ११ झाली आहे, ७ बरे झाले आहेत, ३ जण उपचार घेत आहेत, एकाचा मृत्यू झाला आहे. डिंगोरे येथील बाधितांची संख्या ८२ झाली आहे, ७२ बरे झाले आहेत, ८ जण कोव्हीड सेंटर, तर १ घरीच उपचार घेत आहे, एकाचा मृत्यू झाला आहे. धोलवड येथील बाधितांची संख्या ५७ झाली आहे, ३८ बरे झाले आहेत, १५ जणांवर उपचार सुरु आहेत ४ ,जणांचा मृत्यू झाला आहे, असे डॉ. सारोक्ते यांनी सांगितले ..