पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालामध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात ७ हजार ३४४ एवढी आहे.इयत्ता बारावीमध्ये ८५ ते ९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी २१ हजार ६२८ आहेत. ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थी ४३ हजार ५०६ आहेत. तर ७१ हजार ४६६ विद्यार्थ्यांना ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत गुण मिळाले आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत गुण मिळवणाऱ्यांची संख्या ४४.४८ टक्के एवढी आहे.585000 विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्के गुण इयत्ता बारावीच्या निकालात वाढ झाली असली तरी ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत गुण मिळवणाºया विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा देणाºया एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत ४४.४८ टक्के एवढी आहे. म्हणजेच तब्बल पाच लाख ८५ हजार विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळाले. २ लाख ४० हजार ९४० विद्यार्थ्यांना ६० ते ६५ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळाले.१०० टक्के निकालाची कनिष्ठ महाविद्यालये...व्यावसायिक ८७वाणिज्य ८६७कला ५८९विज्ञान २,३१८शून्य टक्के निकालाची कनिष्ठ महाविद्यालयेविज्ञान २०कला ३१वाणिज्य १९व्यावसायिक १प्रमुख विषयांचा निकाल (टक्के)इंग्रजी ८९.९६मराठी ९७.७३संस्कृत ९९.४६इतिहास ९३.९८भूगोल ९५.५७राज्यशास्त्र ९४.४०अर्थशास्त्र ९३.०६गणित ९७.२०भौतिकशास्त्र ९७.६०रसायन शास्त्र ९८.२३जीवशास्त्र ९८.६६
सात हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 2:04 AM