चाकण : संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असताना परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पकडला असून यात १७ लाख ३१ हजार ८४० रुपये किंमतीचा ४१ पोती गुटखा पकडला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व अन्न भेसळ सुरक्षा रक्षक महेंद्र पाटील यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचा चालक व क्लिनर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आयशर टेम्पोसह २५ लाख ३१ हजार ८४० किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. छुप्या पद्धतीने गुटखा विक्री जिल्ह्यात होत असल्याची माहिती प्रशासनाला गुप्त खबऱ्याकडून मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१३जुलै ) पहाटे मुंबई येथून एक आयशर कंपनीच्या टेम्पो शिक्रापूर येथे गुटखा घेऊन जाणार असल्याचे रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पथकाला मिळाली. त्यानुसार येथील तळेगाव चौकात गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी शिताफीने पकडला. या टेम्पोतुन वाहतूक करण्यात आलेला १७ लाख ३१ हजार ८४० रुपयांचा गुटखा व ८ लाख रुपयांचे वाहने असा सुमारे २५ लाख ३१ हजार ८४० रुपयांचा ऐवज चाकण पोलीस अन्न व औषध प्रशासनान यांच्या संयुक्तपणे झालेल्या कारवाईत जप्त केला. टेम्पो वाहन क्रमांक ( एम. एच. ०४ एच. डी. ५८९० ) या वाहनासह टेम्पो चालक बिपीन वैचन गिरी व क्लिनर मुकेश काशी गिरी यांना ताब्यात घेतले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेखर कुलकर्णी, अजय भापकर, संजय सूळ, नवनाथ खेडकर, होमगार्ड वैजनाथ पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
चाकणला सतरा लाखाचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 3:25 PM
संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असताना परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत जप्त केला.
ठळक मुद्देटेम्पोसह २५ लाखाचा ऐवज जप्त, दोघेजण ताब्यात चाकण पोलीस अन्न व औषध प्रशासनान यांच्या संयुक्तपणे झालेल्या कारवाई