साठलेल्या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मागणीस आणि आरोग्यास प्राधान्य देत तत्काळ सदरील ठिकाणी अंतर्गत ड्रेनेज लाईनची व्यवस्था करावी. अन्यथा, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटामार्फत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, याबाबतचे लेखी निवेदन बारामतीचे प्रांताधिकारी, नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांना देण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रवींद्र सोनवणे, पुणे जिल्हा म. कार्याध्यक्षा रत्नाप्रभा साबळे, शहर अध्यक्ष अभिजित कांबळे, शहर सचिव सम्राट गायकवाड तसेच शाहरुख तांबोळी आदी उपस्थित होते.
————————————————
फोटोओळी—रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटामार्फत अंतर्गत ड्रेनेज लाईनची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२९०६२०२१ बारामती—१६