पुणे : सिंहगड रोडवरील नवले ब्रीजजवळ असणाऱ्या स्वागत लॉजवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे़. महिलांना वेश्या व्यवसायाला लावणाऱ्या दोघांना अटक करुन तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे़.मयंककुमार भगवान पांडे (वय २४, रा़ मु़ फाजनगंज, पो़ सासाराम, जि रोहतास, बिहार) आणि शुभम तुफानी सिंह (वय ३८, रा़ मांगडेवाडी, सातारा रोड, कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार प्रकाश विश्वनाथ लोखंडे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, नवले पुलाजवळील स्वागत लॉज येथे वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली़. त्याची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला़. एका बनावट ग्राहकाला तेथे पाठविण्यात आले़.या ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला़. तेथे पुण्यात राहणाऱ्या २८ ते ३० वर्षाच्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले़. त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या मयंककुमार पांडे आणि शुभम सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे़ .मयंककुमार पांडे आणि शुभम सिंह हे दोघेही या लॉजमधील कामगार आहेत़. गरीब आणि पैशाची चणचण असलेल्या महिलांना हेरुन ते यातून चांगले पैसे मिळतील असे सांगून त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावत असे़. या तीनही महिला गरीब घरातील असून घरोघरी मोलमजूरीचे काम त्या करतात़. त्यांना ते लॉजवर ठेवून घेऊन गिऱ्हाईकांना त्यांच्याकडे पाठवत असे़. पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव अधिक तपास करीत आहेत़.
सिंहगड रोडवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:08 IST
गरीब आणि पैशाची चणचण असलेल्या महिलांना हेरुन ते यातून चांगले पैसे मिळतील असे सांगून त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावत असे़.
सिंहगड रोडवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक
ठळक मुद्देसामाजिक सुरक्षा विभाग : दोघांना अटक