पुणे : लष्कर परिसरातील एका फ्लॅटमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने पदार्फाश केला असून उझबेकिस्तान व भारतीय अशा दोन मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे़शाबनाझ अल्ताफ मीना (वय २९, रा़ धायरी, मूळ कर्नाटक) व सुरेश लक्ष्मण राठोड (वय ३६, रा़ नेहरुनगर, ता. कंधार, जि. नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर सचिन साठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना माहिती मिळाली की, लष्कर परिसरातील एका फ्लॅटमध्ये एका विदेशी व भारतीय तरुणीकडून सचिन साठे व शाबनाझ मीना हे दोघे वेश्या व्यवसाय करून घेत आहेत. त्याची पडताळणी केल्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने लष्कर कँप परिसरातील स्टर्लिंग हाऊस येथील फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी तेथून एक उझबेकिस्तान व एक भारतीय अशा दोन तरुणींची सुटका करण्यात आली. तर रोख ४ हजार रुपये, २ मोबाइल व पीडित मुलीचा पासपोर्ट व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. सुरेश राठोड व शाबनाझ मीना यांना ताब्यात घेऊन सचिन साठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लष्कर परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 3:04 AM