पुणे : विमाननगर परिसरातील लॉजमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून पदार्फाश केला. दलालांच्या मदतीने परराज्यांतील मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाºयासह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ या ठिकाणाहून पोलिसांनी तेथून सिक्कीममधील २ तर दिल्लीतील १ अशा तीन महिलांची सुटका केली आहे़करण शर्मा, योगी ऊर्फ मॉन्टी पटेल, दिनेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रशांत मच्छिंद्र पाटील (वय ४२, रा़ मूळ शहापूर, ता. अंमळनेर, जि. जळगाव) याला अटक करण्यात आली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण शर्मा, योगी ऊर्फ मॉन्टी पटेल व दिनेश हे दलालांच्या मदतीने मुली मिळवून शहरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे व पोलीस नाईक सचिन कदम यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विमाननगर येथील संजय पार्क परिसरातील लॉजवर छापा टाकला. तेथून ३ महिलांची सुटका केली. या वेळी ५ हजार रुपये, ३ मोबाईल फोन इतर कागदपत्रे असा मुद्देमाल जप्त केला. पीडित मुलींना महंमदवाडी येथील रेस्क्यू फाउंडेशन येथे ठेवण्यात आले.ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, पोलीस उपनिरीक्षक अनंता व्यवहारे, कर्मचारी नामदेव शेलार, राजाराम घोगरे, सचिन कदम, तुषार आल्हाट, सुनील नाईक तसेच विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, रमेश साठे व त्यांच्या कर्मचाºयांच्या सहकार्याने करण्यात आली़
विमाननगरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:05 AM