पिंपरी/पुणे : सोशल मिडीयाचा वापर करीत ग्राहक हेरून विविध राज्यातील ७ मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या ५ एजंटांना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. तसेच वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ७ मुलींची तेथून सुटका केली. ही कारवाई मंगळवारी रात्री हिंजवडीतील लक्ष्मी नर्सिंग या इमारतीत करण्यात आली़. कुमार बलबहादूर प्रधान (वय ४७), रणजित बलबहादूर प्रधान (वय २५, दोघे, रा. मुकाईनगर, हिंजवडी), शामसुंदर गंगाबहादूर नेवार (वय २३), बळीराम भक्ती शर्मा (वय २२) आणि बळीराम फोनी गौर (वय २२, सर्व रा. आसाम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. तर त्यांचा सनी नावाचा एक साथीदार फरार झाला आहे. हिंजवडी परिसरात सोशल मिडियाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली. मंगळवारी (दि.१७जुलै) रात्री सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले़. लक्ष्मी नर्सिंग या इमारतीच्या २ फ्लॅटमध्ये दिल्ली, बंगाल, पंजाब, मध्यप्रदेश, नेपाळ आणि महाराष्ट्र या राज्यातील ७ मुली आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली. तसेच मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या ५ एजंटांना अटक करण्यात आली. त्यांच्या १० हजार रुपये व ७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़. आरोपींची कसून चौकशी केली असता हे आरोपी सोशल मिडीयाचा वापर करुन ग्राहकांशी संपर्क साधायचे तसेच त्यांना मुलींची छायाचित्र पाठवून आर्थिक व्यवहार करायचे. येणाऱ्या ग्राहकांकडून त्याचा फोटो आणि आयडी मागवायचे़. त्यावरुन त्याची ओळख पटल्यानंतरच ठरलेल्या ठिकाणी मुलींना पाठवायचे. असा हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून या भागात सुरु होता़. यातील २ मुली या काही दिवसांपूर्वीच आल्या होत्या़. त्यानंतर येथील २ मुली निघून गेल्या होत्या़. २ मुली या वेगळ्या कामासाठी आल्या होत्या़. त्यांना इथे आल्यावर हा प्रकार समजला़. त्यांच्याकडे येणारे ग्राहक प्रामुख्याने आयटीमधील असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे़. अधिक तपासासाठी त्यांना २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे़. याबाबत सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, फ्लॅटमालकांनी आपला फ्लॅट भाड्याने देताना त्या वापर कशासाठी गेला जात आहे, याची माहिती घेणे आवश्यक आहे़. या गुन्ह्यात घरमालकांवरही कारवाई करण्यात येणार असून फ्लॅट सील करण्यात येणार आहेत़. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, उपनिरीक्षक योगिता कुदळे, व्यवहारे, नामदेव शेलार, प्रमोद म्हेत्रे, ज्ञानेश्वर देवकर, नरेश बलसाने, तुषार आल्हाट, सुनिल नाईक, कविता नलावडे, ननिता येळे, अनुराधा ठोंबरे, सचिन शिंदे व हिंजवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली आहे़
हिंजवडी आयटी पार्कमधील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, ७ मुलींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 8:13 PM
हिंजवडी परिसरात सोशल मिडियाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली.
ठळक मुद्दे२ फ्लॅटमध्ये दिल्ली, बंगाल, पंजाब, मध्यप्रदेश, नेपाळ आणि महाराष्ट्र या राज्यातील ७ मुली येणारे ग्राहक प्रामुख्याने आयटीमधील असल्याचे पोलीस तपासात पुढे या गुन्ह्यात घरमालकांवरही कारवाई करण्यात येणार