शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

लोणावळा परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 2:41 PM

जय उर्फ धनंजय कातवारू राजभर (वय 37, रा. नांगरगाव लोणावळा, मूळ राहणार- टिळक नगर, चेंबूर, मुंबई) असे अटक केल्याचे नाव आहे. आरोपी धनंजय हा लोणावळा येथील एका महिलेसोबत हे रॅकेट चालवण्याचे काम करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे

लोणावळा:लोणावळा परिसरात सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधून दोन मुलीची सुटका करण्यात आली असून एका दलालास पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण आणि लोणावळा ग्रामीण पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली आहे.

जय उर्फ धनंजय कातवारू राजभर (वय 37, रा. नांगरगाव लोणावळा, मूळ राहणार- टिळक नगर, चेंबूर, मुंबई) असे अटक केल्याचे नाव आहे. आरोपी धनंजय हा लोणावळा येथील एका महिलेसोबत हे रॅकेट चालवण्याचे काम करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. तसेच यामध्ये अजून कोणकोण सहभागी आहे, याचा शोध सुरु असून लवकरच सर्वजण गजाआड असतील असा विश्वास पोलीस निरीक्षक मोरे यांनी व्यक्त केला आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून दर ठरवून त्या मुलींना मोटारीतून लोणावळा परिसरातील ग्राहकांना पुरवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे जय उर्फ धनंजय यांच्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधला. त्याने व्हॉट्सअप वर वेश्याव्यवसायासाठी मुलींचे फोटो पाठवून दर ठरवल्यानंतर या मुलींना तो मनशक्ती वरसोली, लोणावळा येथे घेऊन येतो, असे सांगितल्यानंतर पोलीसांनी सदर जागी सापळा रचला. त्यानंतर आरोपी हा मोटारीतून दोन मुली घेऊन तेथे आला. खात्री पटताच पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. दोन्ही मुली दिल्ली येथून वेश्या व्यवसायासाठी आणल्या होत्या. या मुलींची सुटका केली असून लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, पोलीस हवालदार ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व स्थानिक गुन्हे शाखेच्या सुजाता कदम, पुनम गुंड तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे युवराज बनसोडे, पुष्पा घुगे, सिद्धेश्वर शिंदे आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाPuneपुणेPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणSex Racketसेक्स रॅकेट