शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

राजस्थानातील अनेक गावात सेक्सटॉर्शनचा झालाय धंदा; पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 1:49 PM

गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावणे, अश्लील बोलायला उद्युक्त करायचे आणि नंतर सोशल मीडिया आणि कुटुंबाला हे पाठवून खंडणी उकळण्याचा धंदा राजस्थानातील अनेक गावात चालत आहे

विवेक भुसे

पुणे: गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावणे, अश्लील बोलायला उद्युक्त करायचे आणि नंतर सोशल मीडिया आणि कुटुंबाला हे पाठवून खंडणी उकळण्याचा धंदा राजस्थानातील अनेक गावात चालत आहे. स्थानिक पोलिसांकडून असहकार्य होत असल्याने या टोळ्यांना पकडण्यात अपयश येत आहे.

व्हिडीओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडण्यासारखे अनेक प्रकार पुणे आणि राज्यातच घडत आहेत. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर पुणे पोलीस दलाचे पथक तपासासाठी राजस्थानात गेल्यावर हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले की, सेक्सटॉर्शनच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर त्याचा तपास करीत असताना राजस्थानमधील गावांची नावे अधिक आढळून आली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक तिकडे गेले होते. त्यावेळी जमतारामध्ये जशी बेरोजगार तरुण-तरुणी बँक फ्रॉडच्या गुन्ह्यात फसवणूक करतात. तशाच पद्धतीने या काही गावांमधील तरुण-तरुणी सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळून आले आहे. हा तेथील काहींचा उद्योगच झाला आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे येत असल्याने स्थानिक लोकांचा या तरुण-तरुणींना पाठबळ मिळत आहे.

पुणे पोलिसांप्रमाणे अन्य राज्यातील पोलीस पथके या ठिकाणी तपासासाठी येऊन गेल्याची माहिती पुणे पोलीस पथकाला मिळाली होती. स्थानिक नागरिकांचा असहकार, स्थानिक पोलिसांचे मिळत नसलेले सहकार्य यामुळे या आरोपींना शोधून त्यांना ताब्यात घेणे अवघड जाते. त्याचबरोबर अनेक तक्रारदार सुरुवातीला तक्रार देतात. पण, पुढे त्यांचा त्रास बंद झाला की ते प्रत्यक्ष फिर्याद देत नाही. त्यामुळे अशा सायबर चोरट्यांचे फावते आहे.

मुलींच्या आवाजात टाकतात जाळे

पुण्यातील एका तरुणाला एका तरुणीने व्हिडिओ काॅल केला. त्याच्याशी बोलून संपर्क वाढविला. आपण प्रेमात पडल्याचे भासवून त्याला कपडे उतरविण्यास भाग पाडले. या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग या टाेळीने केले. त्यानंतर या तरुणाला खंडणीसाठी फोन यायला सुरुवात झाली. तुझ्या सगळ्या मित्रांच्या सोशल मीडियावर हे व्हिडिओ टाकू, अशी धमकीही दिली.

नातेवाईक, परिचितांची गोळा करतात माहिती

एखाद्याला शिकार बनविण्याच्या अगोदर सोशल मीडियावरून या व्यक्तीची आणि त्याच्या नातेवाईक, मित्र परिवाराची सगळी माहिती ही टोळी गोळा करते. त्यांचे नाव घेऊन त्यांना हा व्हिडिओ पाठवू का, अशी धमकी दिली जाते. बंगळूरूमध्ये मध्ये सेक्सटॉर्शनमुळे एका एमबीएला शिकणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली होती. मुंबईत एका डॉक्टरला अशाच प्रकारे त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून वारंवार खंडणी उकळण्यात आली होती. अनेक मान्यवर, राजकीय कार्यकर्ते यांनाही अशा प्रकारे जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न अनेकदा झाले आहेत.

जमताराच्याच मॉडेलचा वापर

मै बँकसे बोल रहा हू, आपका केवायसी अपडेट करना है, आपका बँक डिटेल्स दिजीए, असे सांगून तुमच्या बँक खात्याची माहिती काढून घेऊन क्षणार्धात तुमचे बँक खाते रिकामे केले जाते. या प्रकारांसाठी झारखंडमधील जमतारा हे छोटेसे गाव देशभरात कुख्यात बनले, ते सायबर क्राईममुळे. जमतारा ही सत्य घटनेवर आधारित एक वेबसीरिजही आली होती. तसाच काहीसा प्रकार पुणे सायबर पोलिसांनी राजस्थानमधील सीमेवरील काही गावांमध्ये आढळून आला आहे. जमतारा जसे बँक फ्रॉडमध्ये गाजले, तसा प्रकार या गावामधून सेक्सटॉर्शनचा सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुणे पोलीस पथक जमतारा येथे तपासासाठी गेले असता, त्यांना दगडफेकीला सामोरे जावे लागले होते. राजस्थानमधील या सीमावर्ती गावांमध्ये गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकाला अनेक अडचणींशी सामना करावा लागला होता. 

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसsex crimeसेक्स गुन्हा