पिंपरी: कंपनीत काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपीनगर तळवडे ठिकाणी मार्च २०१९ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. पीडित ४० वर्षीय महिलेने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जनार्दन धुळगुंडे (रा. तळवडे), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कंपन्यांमध्ये माझी ओळख आहे, कंपनीत काम मिळवून देतो, असे आरोपीने आमिष दाखवले. पत्नीला घटस्फोट देऊन सर्व सोय करतो, असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याच्या चारचाकी वाहनातून अज्ञात ठिकाणी घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच शारीरिक शोषण करण्याच्या हेतूने वारंवार त्रासही दिला. हे सर्व करून महिलेचा विश्वासघात आणि फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
महिलेच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन केला लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 15:48 IST
आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल
महिलेच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन केला लैंगिक अत्याचार
ठळक मुद्देकंपनीत काम मिळवून देण्याच्या आमिषाने केली महिलेची फसवणूक