शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

Pune Crime: खोट्या डॉक्टरकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याचीही दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 10:37 AM

एका व्यक्तीने डॉक्टर असल्याचे भासवून २९ वर्षीय विवाहितेचा विश्वास संपादन केला. आणि वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले

ठळक मुद्देमहिलेच्या नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १६ लाख ६५ रुपये घेऊन फसवणूक

पुणे : पुण्यातील विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन महिला अत्याचाराचा एक प्रकार उघडकीस आला. एका व्यक्तीने डॉक्टर असल्याचे भासवून २९ वर्षीय विवाहितेचा विश्वास संपादन केला. आणि वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच आपले म्हणणे ऐकले नाही तर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 

नायक रुद्रा रमेशराव उर्फ किशन रमेशराव जाधव (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. २९ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली. हा प्रकार मार्च २०२१ ते ऑक्टोबर २०१९ या काळात वेळोवेळी घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीने फिर्यादी महिलाडॉक्टर असून ससून हॉस्पिटल येथे नोकरीला असल्याचे सांगितले. स्वतःचे नर्सिंग कॉलेज आणि फार्मसी कॉलेज असल्याचे सांगून विमाननगर परिसरातील फ्लॅटमध्ये फिर्यादी महिलेला बोलावून घेतले. तिथे त्याने या महिलेला खोटे आयकार्ड आणि वैद्यकीय डिग्रीचे बनावट कागदपत्रे दाखवून ती खरी असल्याचे भासवले. त्यानंतर फिर्यादीच्या कौटुंबिक वादाचा फायदा घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिच्यासोबत घरामध्ये जबरदस्तीने लग्नही केले. त्यानंतर फिर्यादीच्या नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १६  लाख ६५ रुपये घेऊन फसवणूक केली. 

दरम्यान काही काळानंतर फिर्यादीला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आरोपीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आरोपीने तु माझे ऐकले नाही तर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या पतीला जीवे मारण्याची आणि नोकरी लावण्यासाठी घेतलेल्या पैशाच्या व्यवहारांमध्ये अडकवण्याची धमकी दिली. सुरुवातीच्या काही काळात बदनामी होईल या भीतीने फिर्यादीने तक्रार दिली नव्हती. परंतु आरोपीकडून होणारा त्रास असह्य झाल्याने त्यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

टॅग्स :LohgaonलोहगावPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीdocterडॉक्टरfraudधोकेबाजीWomenमहिला