पिंपरी - क्रांतिज्योती सावित्रीबाईंची भूमिका साकारायची...तर कधी माता रमाई, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची माता वेलुबाई... एवढेच नव्हे तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील अशा समाजसुधारक, राष्टÑ उद्धारक कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट एकपात्री प्रयोगातून उलगडून दाखविण्याचे कार्य शारदाताई मुंढे अविरतपणे करीत आहेत. राज्यभर सुमारे पाच हजारांहून अधिक प्रयोगांचे सादरीकरण करून शारदातार्इंनी प्रबोधनाचा यज्ञ अखंड तेवत ठेवला आहे.‘साधी राहणी, उच्च विचार’ या तत्त्वाचा जीवनात अंगिकार करून दोन दशकांहून अधिक काळ शारदातार्इंचे प्रबोधनाचे कार्य सुरू आहे.पिंपरीगावात राहाणाºया शारदातार्इंचे रहाणीमान अगदी साधे आहे. अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत असताना, त्यांनी कलेची आवड जोपासली आहे. छोट्या मोठ्या समारंभामध्ये त्या ‘व्हयं मी सावित्री बोलतेय’, तसेच ‘मी साहेबांची रमा’, ‘अहिल्याबाई होळकर’, ‘राजमाता जिजाऊ’ या कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट त्या एकपात्रीतून उलगडून दाखवतात. अगदी भूमिकेशी एकरूप होऊन त्या प्रयोगाचे सादरीकरण करतात.१९९० ला व्हयं मी सावित्री बोलतेय हा पहिला प्रयोग सादर केला. त्यानंतर शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती व अन्य सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात वेळोवेळी प्रयोग सादर करून त्यांनी आतापर्यंत पाच हजार एकपात्री प्रयोग केले आहेत. मानधन मिळविणे हा एकपात्री प्रयोग सादर करण्यामागील उद्देश नाही.पथनाट्याच्या माध्यमातूनकारकिर्दीला केली सुरू वातपथनाट्याच्या माध्यमातून कलाकार म्हणून शारदातार्इंनी कारकीर्द सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांची प्रबोधनाची वाटचाल सुरूच आहे. पिंपरीतून सुरू केलेली प्रबोधनवारी आता महाराष्टÑाच्या कानाकोपºयात पोहोचली आहे. विविध ठिकाणी जाऊन त्या एकपात्री प्रयोग सादर करतात. अंगणवाडी सेविका असल्याने शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचेही काम त्या तळमळीने करतात. सामाजिक जाणिवेची त्यांनी जपणूक केली आहे. बचत गटांना प्रशिक्षण, अशिक्षित महिलांना साक्षरतेचे धडे देण्यापासून ते अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक मदत करण्यापर्यंत त्यांनी वैयक्तिक योगदान दिले आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध संघटनांच्यावतीने पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.समाजाचे प्रबोधन व्हावे, हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंतची वाटचाल केली असल्याचे शारदाताई सांगतात. सुरुवातीला जेमतेम शिक्षण असलेल्या शारदातार्इंनी विवाहानंतर विविध जबाबदाºया पेलत,दहावी आणि बारावी, पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. अखेरच्या श्वासापर्यंत प्रबोधनाचा हा वारसा जपण्याचा त्यांचा मनोदय आहे.
प्रबोधनाचा वसा जपणा-या शारदाताई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 3:03 AM