पुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी शाहीर हेमंतराजे मावळे यांची २०२१-२६ च्या कार्यकालासाठी फेरनियुक्ती करण्यात आली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली, यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी शाहीर गणेश टोकेकर तर कार्याध्यक्षपदी प्रा. शाहिरा संगीता मावळे यांची निवड करण्यात आली असून, सचिवपदी अरुणकुमार बाभूळगावकर तर सहसचिवपदी शाहीर महादेव जाधव यांची निवड झाली आहे. इतिहास अभ्यासक मोहन शेटे, माधवसिंह परदेशी, प्रा. रूपाली देशपांडे, सुरेश तरलगट्टी यांची विश्वस्तपदी निवड झाली आहे. प्रचार प्रसिद्धी प्रमुखपदी चेतन हिंगे आणि व्यवस्थापकपदी शाहीर होनराज मावळे असणार आहेत.
शाहिरी व लोककलांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे. प्रबोधिनीच्या स्थापनेपासून शाहीर हेमंतराजे मावळे कार्यरत आहेत.