लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अमेरिकेमध्ये व इतर मोठ-मोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी ६० टक्के खर्च केला जातो. परंतु शाहू महाराजांनी सक्तीचे शिक्षण केले व ते मोफत केले, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, पुणे व तिच्या विविध शाखांमार्फत शाहू जयंती उत्सव केनेडी रोड, पुणे येथील आरटीओजवळील संस्थेच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास संस्थेचे आॅनररी सेक्रेटरी मालोजीराजे छत्रपती, आॅनररी जॉईन्ट सेक्रेटरी सुरेश प्रताप शिंदे, संस्थेचे खजिनदार अजय उत्तमराव पाटील, कारभारी मंडळाचे अध्यक्ष साहेबराव आर. जाधव, संस्थेचे सभासद, इतर मान्यवर, संस्थेच्या विविध शाखांचे प्रमुख, विद्यार्थीवृंद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इ. उपस्थित होते. संभाजीराजे तसेच मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शाहूमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की शाहूमहाराजांचे कार्य पाहिले तर असे कोणतेही कार्यक्षेत्र नाही, की ज्या ठिकाणी शाहूमहाराजांनी केलेले कार्य दिसत नाही. जनतेचा सामाजिक प्रश्न सोडविण्याचा, बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न असो, जाती विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे सर्वमान्य आहे. हे सर्व करीत असताना त्यांच्या असे लक्षात आले, की बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यावेळी त्यांनी मोफत व सक्तीचे शिक्षण केले.यावेळी संस्थेतर्फे चालविल्या जात असलेल्या शाखांमधील विविध क्षेत्रांमध्ये ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विशेष प्रावीण्य व उल्लेखनीय यश संपादन केलेले आहे, अशांचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
शाहूराजांनी शिक्षण सक्तीचे केले
By admin | Published: June 28, 2017 4:21 AM