- किरण शिंदे
पुणे : नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात शिक्षण विभागात मोठ्या पदावर असलेल्या शैलजा दराडे यांना अखेर पुणे पोलिसांनी केली अटक आहे. यापूर्वी शिक्षण विभागात पैशांच्या बदल्यात नोकरीचे अमिष दाखविल्याने दराडेचे निलंबन केले होते. त्यांनी राज्याच्या शिक्षण विभागात नोकरी लावण्याचा अमिष दाखवून पैसेही घेतले होते. मात्र नोकरी न लावता फसवणूक केली. त्यावेळी दराडे या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त होत्या. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल होता. त्यानंतर त्यांचे निलंबनही करण्यात आले होते. आता पुणे पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आले आहे.
शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेऊन 44 उमेदवारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते.