- किरण शिंदे
भाजपच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. इतिहास 27 फेब्रुवारी रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे.
भारतीय जनता पक्षाकडून या जागेवर कोण उमेदवार असेल हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मात्र आता मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी आता आमच्या घरात उमेदवारी मिळावी अशी इच्छा असल्याचे सांगितले आहे. शैलेश टिळक म्हणाले, मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी आमच्या घरात उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे. परंतु उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
कसबा परिसरात मुक्ता टिळक यांनी वीस वर्ष काम केले आहे. आमदार झाल्यानंतरही त्यांनी काम केले आहे. मागील तीन वर्षे प्रकृतीने साथ न दिल्याने जेवढे अपेक्षित होते तेवढे काम त्या करू शकले नाहीत. मात्र वीस वर्षात त्यांनी केलेले काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. जेणेकरून त्यांची अधुरी पाहिलेली स्वप्न, कामे पूर्ण करता येईल असे मला वाटते. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्या पतीने दिलेल्या प्रतिक्रिया नंतर भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.