पुणे : नेहमी बंद असणारा शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा शनिवारवाड्याच्या 287 व्या वर्धापनदिनानिमित्त उघडण्यात आला. शनिवारवाड्याचा भव्य असा दिल्ली दरवाजा उघडतानाचे दृश्य पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली हाेती. वर्षभर बंद असणारा दिल्ली दरवाजा मागील काही वर्षांपासून थाेरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाड्याच्या वर्धापन दिनी उघडण्यात येताे. शनिवारवाड्याच्या 287 व्या वर्धापनदिनी सकाळी 9 वाजता दिल्ली दरवाजा उघडण्यात आला. काही वेळ हा दरवाजा खुला ठेवण्यात आला. श्रीमंत थाेरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले. इतिहास तज्ञ माेहन शेटे, पेशव्यांचे वंशज उद्यसिंह पेशवा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गाेखले आदी उपस्थित हाेते.
उदयसिंह पेशवा म्हणाले की, शनिवारवाडा हटाव माेहिम झाली हाेती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारवाड्याचा 287 वा वर्धापनदिन साेहळा उत्साहात पार पडताेय. सध्या शनिवारवाड्याच्या अनेक गाेष्टींची दुरावस्था झाली आहे. शनिवारवाड्याची याेग्यप्रकारे निगा राखणे आवश्यक आहे.