जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ही योजना राबविण्यात आली आहे. ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या चार योजना यात राबविण्यात आल्या आहेत. या वेळी पंचायत समिती सभापती नीता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, जिल्हा परिषद सदस्य भारत खैरे, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, प्रदीप धापटे, संजय भोसले, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सरपंच हनुमंत भगत, ग्रामपंचायत सदस्य गणेश भापकर, ग्रामसेवक अजित जाधव, ग्रामपंचायत सेवक अमित भापकर उपस्थित होते. सायंबाचीवाडी गावाला हा पुरस्कार मिळाला, त्यामागे गावातील सर्व नागरिकांचे सहभाग महत्त्वाचा आहे, असे कौतुक मान्यवरांनी केले. त्याबद्दल गावातील सर्व ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कृषीक्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावे असणारी आदर्श कृषी ग्राम योजना शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि शेती प्रक्रिया उद्योगाला चालना देणारी आहे. त्यामुळे साहजिकच गावच्या विकासाला देखील हातभार लागणार आहे.
-प्रमोद जगताप
उपसरपंच सायंबाची वाडी
३० बारामती
सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीला शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार प्रदान करताना पंचायत समितीचे पदाधिकारी व अधिकारी.