राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषदेने (नॅक)‘शरदचंद्र पवार काॅलेज ऑफ फार्मसी’ डुंबरवाडीच्या परीक्षणासाठी दि. १५ व १६ फेब्रुवारी स परीक्षणासाठी देशातील विविध राज्य व विभागातील प्रतिनिधींची निवड नॅक समितीद्वारे करण्यात आली होती.
प्रारंभी विशाल तांबे यांनी स्वागत केले.
प्राचार्य डॉ. गणेश दामा यांनी नँक समिती समोर मागील
पंचवार्षिक अहवाल सादर करून भविष्यातील संख्यात्मक आराखडा मांडला
क्वालिटी अश्युरन्स सेलचे काॅर्डिनेटरचे डॉ. सुमीत जोशी यांनी या महाविद्यालयाची थोडक्यात माहिती दिली. सर्व प्राध्यापकांनी एकत्रितपणे बनविलेल्या कागदपत्रांचे सादरीकरण प्रा. शीतल बिडकर यांनी केले.
या तपासणी अंतर्गत परीक्षण समितीने परिषदेकडून ठरवून दिलेल्या ७ विविध विभागांतर्गत येणारी कागदपत्रे, पायाभूत सुविधांची पडताळणी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश दामा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अविरत परिश्रम घेतले. त्याचे फल म्हणजे महाविद्यालयास मिळालेले ‘बी’ नामांकन, असे प्राचार्य डॉ. दामा म्हणाले.