युगात्मा योद्धा शेतकरी शरद जोशी वैचारिक ऑनलाइन व्याख्यानमाला चाकण कला व वाणिज्य महाविद्यालय, तसेच अभिमन्यू शेलार मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सबनीस बोलत होते.
चाकण शिक्षण मंडळाचे संस्थापक विश्वस्त मोतीलाल सांकला, संस्थापक विश्वस्त सचिव डॉ. अविनाश अरगडे, महाशिवार ॲग्रोचे चेअरमन अभिमन्यू शेलार, प्राचार्य डॉ. राजेश लाटणे, ग्रंथपाल प्रा. मिलिंद भुजबळ, समन्वयक डॉ. शिवाजी एंडाईत, सहसमन्वयक प्रा. हेमकांत गावडे, प्रा. हनुमंत मराठे ऑनलाइन व्याख्यानमालेस उपस्थित होते.
या तीनदिवसीय ऑनलाइन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. उमेश बगाडे यांच्या ‘वसाहतकालीन शेतकरी चळवळीचे स्वरूप’ या व्याख्यानाने घातले व दुसरे पुष्प स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील भाषा, साहित्य व संस्कृती संकुलाचे प्रमुख संचालक प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षणाची दिशा’ या व्याख्यानाने पूर्ण झाले. व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन आरती पवळे हिने केले, तर आभार डॉ. शिवाजी एंडाईत यांनी मानले.