शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरच्या पोलीस कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 4:29 PM

कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. त्या दोघांचा शोध सीबीआयने सुरू केला आहे. याच गोष्टीच्या तपासासाठी शरद कळसकरची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देचारपैकी एक पिस्तुल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले असावे असा सीबीआयचा अंदाज एटीएसने अटक केली तेव्हा कळसकरकडून बंदूक आणि दुचाकी जप्त

पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली त्यावेळी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांना ओळखणारे दोघे जण आधीच पोहचले होते. त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे पुलावर पोहचले. जेव्हा दाभोलकर पुलावर आले. तेव्हा शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी हेच दाभोलकर आहेत का याबाबत तिथे आधीच उपस्थित असलेल्या दोघांकडून खात्री केली. ती होताच दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या चार पिस्तुलांची तोडून ठाण्यातील कळवा , वसई आणि कल्याणमधील खाडी पूल यांपैकी नेमकी कुठे विल्हेवाट लावली याचा तपास करण्यासाठी कळसकरच्या पोलीस कोठडीत वाढ देण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाने केली होती. न्यायालयाने ती मंजूर करत कळसकरच्या पोलीस कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.  सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करताना कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते, असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. त्या दोघांचा शोध सीबीआयने सुरू केला आहे. याच गोष्टीच्या तपासासाठी शरद कळसकरची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. वैभव राऊत आणि शरद कळसकर २३ जुलैला रात्री वैभव राऊतच्या घरुन निघाले. त्यांच्याकडे असलेल्या चार पिस्तुलांची त्यांना विल्हेवाट लावायची होती. ती पिस्तुलं त्यांनी तोडली आणि पिस्तुलाचे तूकडे एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात फेकून दिले. हे तुकडे ज्याठिकाणी फेकले ती जागा ठाण्यातील कळवा येतील पुल, वसईमधला खाडी पुल किंवा कल्याणमधील खाडी पुल यापैकी एक जागा होती. मात्र, रात्रीची वेळ असल्याने या तीनपैकी नक्की कोणत्या जागी पिस्तुलाचे तुकडे टाकण्यात आले हे शरद कळसकरला आत्ता आठवत नसल्याने त्याची आणखी चौकशी करण्यासाठी कोठडी वाढवून मागण्यात आलीय. या चारपैकी एक पिस्तुल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले असावे असा सीबीआयचा अंदाज आहे. बचाव पक्षाची बाजू मांडताना अ‍ॅड. धर्मराज चंडेल यांनी सांगितले, बारा दिवसांच्या कोठडीत कळसकर यांच्याकडून काहीच हस्तगत करण्यात आलेले नाही. हस्तगत करण्यासारखे काहीच सामान माझ्याकडे नसल्याचे यापूर्वीच कळसकर याने  सीबीआयला लेखी दिले होते. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्याकडे सीबीआय कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीकडून कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येबाबत तपास करण्यात आलेला आहे तर दिगवेकर याला मारहाण झाली आहे. त्यामुळे कळसकर याच्या कोठडीचा देखील गैरवापर होऊ शकतो. कळसकर याला एटीएसने अटक केली तेव्हा त्याच्याकडून बंदूक आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हस्तगत करण्यासाठी वस्तू राहिलेली नाही. त्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी, अशी मागणी त्याचे अ‍ॅड. चंडेल यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरArrestअटकCBIगुन्हा अन्वेषण विभाग